प्रतिनिधी संतोष वाघमारे
धामणगाव रेल्वे
कलियुगातील भगवान श्री खाटू श्याम बाबा यांचे पवित्र देवस्थान भूमी राजस्थान येथील खाटु श्यामजी येथे आहे. भगवान श्रीकृष्णांना ज्यांनी आपल्या शीश दान दिले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने श्याम बाबाला आशीर्वाद दिला होता की ,जो कोणी तुझ्याजवळ येईल त्याच्या तू सर्व मनोकामना पूर्ण करशील तेव्हा या ठिकाणी हजारो लाखो भाविक दर्शनासाठी जातात. धामणगाव रेल्वे शहरातील अनेक श्याम प्रेमी यांनी नवीन वर्ष श्याम बाबा सोबत साजरा करण्यासाठी राजस्थान येथील खाटू श्याम येथे जाऊन श्याम बाबासोबत दर्शन घेऊन साजरा केला .नवीन वर्ष साजरा करण्यासाठी देशातील अनेक ठिकाणावरून श्याम प्रेमी खाटू श्याम राजस्थानी येथे दर्शन घेतात. मान्यता आहे की ,श्री खाटू श्याम बाबा यांचे जो कोणी भक्ती करेल त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात .तेव्हा सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवो, देशात शांती ,समृद्धीचा वास असो असे श्याम प्रेमींनी खाटू श्याम बाबांना प्रार्थना केली