गुरुकंज मोझरी (वार्ताहर)
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मातोश्री पूज्य मंजुळा माता यांच्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त भव्य विदर्भ स्तरीय एकल भक्तीगीत गायन स्पर्धा 5 जानेवारी 2025 रोजी स्मृती मंदिर गुरुकुंज आश्रम येथे आयोजित केली असून,
यावेळी भव्य बक्षिसांची लय लूट होणार आहे.
या एकल भक्तिगीत गायन स्पर्धेमध्ये पुरुष व महिला खुला गट तर बाल गटा असे दोन गट स्पर्धेसाठी असून पुरुष व महिला गटाकरता प्रथम बक्षीस 7000 रुपये सौ.वैशालीताई धूमोने सरपंच गुरुदेवनगर व अनिल डिक्कर ग्रामपंचायत सदस्य गुरुदेव नगर यांच्याकडून तर दिव्तीय बक्षीस 5000 पाच हजार रु. अभिषेक कासोदे गटविकास अधिकारी प.स.तिवसा तर तृतीय बक्षीस तीन हजार रुपये दिलीप मा घुरडे उच्च श्रेणी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा गुरुदेव नगर यांच्याकडून देण्यात येईल.
तर बालगटात व दोन ते पंधरा वर्षापर्यंत प्रथम बक्षीस डॉ. मयुरजी कळसे तहसीलदार तथा दंडधीकारी तिवसा यांच्या कडून 5000 पाच हजार रु. तर द्वितीय बक्षीस प्रदीपजी शिरस्कर पोलीस निरीक्षक तिवसा यांच्या कडून 3000 तीन हजार रुपये तर तृतीय बक्षीस धनराज बारबुद्धे पत्रकार यांच्याकडून पंधराशे 1500 रुपये स्वर्गीय दौलतराव बारबुद्धे स्व.अंजनाबाई बारबुद्धे यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येईल
यावेळी प्रोत्साहन पर बक्षीस उपसरपंच मिलिंद काळमेघ, पोलीस पाटील बंडू जाधव, गुरुवर्य मेडिकल,सुयोग कुरळकर, डॉ मधुकर गुंबळे 1000 एक हजार रु.प्रमय शास्त्रकार यांच्याकडून 500 रुपये देण्यात येईल.
तसेच राजेश वाकडे पोलिस उपनिरीक्षक नांदगाव पेठ यांचे कडुन 2000 दोन हजार रु.योगेश बाहे अमरावती यांचे कडुन 3000 हजार रु. मिळून जमा झाल्या रकमेतून प्रथम नोंदणी करणाऱ्या पन्नास 50 स्पर्धाकांना प्रोत्साहन पर शंभर 100 रुपयाचे बक्षीस दिले जाईल. स्पर्धेकरीता अभंग, भजन, गवळण,भक्तीगीत यापैकी कोणती एक गीत म्हणता येईल वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या भजनाला विशेष प्राधान्य देण्यात येईल स्पर्धकाला गीत पाच मिनिटात पूर्ण करावे लागेल तबला व हार्मोनियम वादक मंडळ तर्फे पुरविण्यात येईल किंवा स्वतः आणले तरी चालेल तसेच बाल गटासाठी 2 ते 15 वर्षा पर्यंत मुला मुलींनी आधार कार्ड सोबत आणावे तरच प्रवेश दिला जाईल. खुला गट प्रवेश फी 400 रुपये तर बालगट प्रवेश फी 200 रुपये प्रवेश फ्री आहे.शुक्रवार 3 जानेवारी 20 25 पर्यंत नोंदणी करावी व प्रवेश निश्चित करावा अधीक महिती किरण खंडारे माजी उपसरपंच गुरुदेव नगर मो.9561842501 नरेंद्र कठाणे मो 8888723681 दिपक तीखे माहादेव बेले या मोबाईल क्रमांक वर संपर्क करु शकता.
तरी स्पर्धकांनी प्रवेश निश्चित करावा असे आवाहन आकाशवाणी कलावंत धनश्री किरण खंडारे यांनी केले आहे.