धामणगांव रेल्वे :- आज दि.२३ डिसेंबर २०२४ रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती, धामणगांव रेल्वे मध्ये बाजार आवारावर शेतकरी दिन साजरा करण्यात आला.

0
40
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

भारतातील शेतकरी हा भरतातल्या अर्थव्यवस्थेचा कना मानला जातो. शेतक-या बददल आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात येतो. त्याच प्रमाणे धामणगांव कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. बाजार समितीच्या बाजार आवारावर मा.सौ कविताताई श्रीकांत गावंडे सभापती महोदया यांच्या हस्ते प्रथम शेतकरी प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर धामणगांव रेल्वे तालुक्यातील शेतमाल विक्री करीता आलेल्या महिला शेतकरी सौ. रंजताताई उगरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच सुनील भैसे यांचा शाल श्रीफळ देऊन मा.डॉ. प्रमोद रॉघे यांच्या हस्ते संचालक मा.श्री. गिरीष सोहनलाल भुतडा यांच्या हस्ते श्री महेश मनहोरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला संचालक मा.श्री राधेश्यामजी चांडक बाजार समितीचे सचिव प्रविण वानखडे व मोठ्या संख्येने शेतकरी बंधु उपस्थित होते तसेच शेतकरी दिन असल्यामुळे शेतकरी बंधुंना मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमाला आडते असोसिएशन चे अध्यक्ष श्री सुरेन्द्र जयस्वाल माजी अध्यक्ष श्री निलु पनपालिया, पवन लाहोटी, देवराव कापसे, नंदु राठी, सचिन राठी, रमेश ठाकरे, प्रमोद मुंधडा आशिष कापसे, अमोल हटवार, निखील बावणे, तसेच व्यापारी राजेश गंगण, सचिन गंगण, आयुष गंगण, सचिन मुंधडा, तसेच बाजार समितीचे कर्मचारी संजय तुपसुंदरे, दिनेश गोमासे, राजु तायडे, भुषण जुमडे,नितीन मांडवगणे विनोद जांभेकर, कविश मेटे, सुरज तुपसुंदरे, पवन श्रीखंडे, आतिश कोरडे, आदित्य भिवरकर इत्यादी हमाल बंधु, मापारी बंधु व मदतनिस बंधु मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Reply

veer nayak

Google Ad