धामणगाव रेल्वे,
विदर्भातील लाखो भाविकांचे ह्रदयस्थान असलेले सद्गुरु माऊली श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या दर्शनासाठी नव वर्षानिमित्त काशिखेड येथून माऊली भक्तांची पायदळ वारी सम्पन्न झाली.
वारी मध्ये ३०० भक्तांचा सहभाग होता श्री क्षेत्र शेगांव येथे माऊलीच्या दर्शनानंतर सर्व भक्त आपल्या गावी परतले .
काशीखेड येथील श्री गजानन महाराज मंदिरापासून निघालेली उपरोक्त वारीचे धामणगाव येथे सह ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले संपूर्ण धामणगाव नगरीत रांगोळ्या भगव्या पताका तसेच भव्य दिव्य आतिषबाजी करण्यात आली यावर्षीचे वारीचे तिसरे वर्ष होते
तालुक्यातील काशीखेड येथुन निंघालेली वारी धामणगांव रेल्वे,विरूळ रोंघे, मांजरखेड, अंजनगाव बारी, लोणी टाकळी, माना, मूर्तीजापुर, जांभा बुद्रुक, दहिगांव गावंडे, मोठी उंबरी, गायगांव अकोला, कसुरा ,नागझरी येथील गोमाजी महाराज यांचे दर्शन व कुंड येथून स्नान करून वारकऱ्यांची पायदळ वारी शेगांव येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे पोहचली. वारीमध्ये नागपुर, जबलपुर, चंद्रपुर, वर्धा, यवतमाळ अकोला ते सुद्धा वारकरी सहभागी झाले होते. तालुक्यातील महिला व पुरुष वारकरींचा उत्साहाने या वारीत सहभाग निदर्शनास आला . पायदळ वारी मध्ये सर्व सुविधा व देखरेख वारी प्रमुख नरेश गावंडे, अक्षय गजाननराव मुळे,सौ. श्रद्धा अक्षय मुळे, निलेश गुल्हाने, दीपक व्यास, हरिश अग्रवाल यांनी सांभाळले