धामणगाव रेल्वे : येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत 13 डिसेंबर 2024 रोजी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी तर प्रमुख अतिथी ऑल इंडिया टेनिस आणि क्रिकेट मार्गदर्शक श्री नंदू सोर्गीवकर स्कूल ऑफ स्कॉलर्स समूहाच्या शैक्षणिक सल्लागार माया सराफ तसेच प्री प्रायमरी हेड शबाना खान उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.
मान्यवरांच्या हस्ते शाळेतील ध्वज फडकवून, मशाल प्रज्वलित करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मार्च पास्ट आणि क्रीडा शपथविधीनंतर महोत्सवाचे उद्घाटन झाले.
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या सादरीकरणातून आपली कौशल्ये सादर केली. यामध्ये महाराष्ट्र दर्शन, झुंबा नृत्य, बेडूक ड्रिल, झेंडा कवायत, घुंगूर काठी, योग प्रदर्शन, फ्लॉवर कवायत, रिबन कवायत, रिंग कवायत यांचा समावेश होता.
शाळेतील विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक खेळ आणि धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. याशिवाय, पालकांसाठीही धागा व दगड रेस, पॉट रेस यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये पालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी (प्राथमिक व माध्यमिक) आणि सर्वोत्कृष्ट हाऊस म्हणून रेड हाऊसला सन्मानित करण्यात आले. इयत्ता दहावीतील विद्यार्थी सोफिया खान, अर्पित ढवळे या विद्यार्थ्यांनी इंग्रजीमधून तर मधुरा राऊत, खुशी कोल्हे, पलक खंडेलवाल हिंदीतुन, तसेच निमिषा इंगोले, राजवीर शिरभाते या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतून कार्यक्रमाचे संचालन केले. तसेच क्रीडा स्पर्धांचे संचालन शर्वरी तायडे आणि चैताली बोदडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता दहावीतील श्लोक चांडक या विद्यार्थ्याने उपस्थितांचे आभार मानले.
शाळेच्या प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमांमुळे कार्यक्रम संपन्न झाला.