आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : सुमारे दिडशे वर्षापूर्वी
विदर्भात एक विरक्त स्त्रीसंताचा बोलाबाला होता. त्या संत म्हणजे आर्वी येथील मायबाई या होत. वर्धा जिल्हयातील तेलंगरायची आर्वी हे गांव त्यावेळी एक प्रसिध्द संतस्थान म्हणून लौकीकाला चढले होते. मायबाईचा लौकीक त्याच्या काळात पंढरपूर पर्यन्त पसरला होता. अशा या महान संत मायबाईचा द्विशताब्दी पुण्यतिथी महोत्सव थाटामाटात आर्वीला व्हावा व त्यासोबतच त्यांचे शक्तीमान सुपुत्र श्रीसंत पांडूरंग महाराज यांचा २२५ वा पुण्यतिथी महोत्सव व संत अच्युत महाराज जन्मशताब्दी सांगता अशा एकत्रीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन अनेकविध कार्यक्रमाची रेलचेल आहे. करण्यासाठी एक अस्थायी समिती नेमली असून त्या समितीचे अध्यक्ष श्री संत अच्युत महाराज सत्संग मंडळ मुंबईचे श्री. सुधीर दिवे असुन कार्याध्यक्ष प्रा.डॉ. नारायणराव निकम हे आहेत.
सचिव म्हणुन कृष्णराव गिरधर हे कार्यरत आहेत. हा आध्यात्मिक महोत्सव दि. २३ डिसेंबर ते २९ डिसेंबर पर्यन्त मोठ्या प्रमाणात साजरा होणार असुन यात या कार्यक्रमाबाबतचे सविस्तर वृत्त असे की या कार्यक्रमाची सुरूवात या संत महात्माच्या पादुकांची भव्य शोभा यात्रेने होणार आहे. या आध्यात्मिक ज्ञान यज्ञाची सुरूवात सारेगम फेम प्रसिध्द गायक पुणे येथील प्रथमेश लघाटे व मूग्धा वैशपायन यांच्या भक्तीसंगीताने होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमात प्रसिध्द प्रवचनकार सोपानजी कान्हेरकर महाराज, लोकप्रिय किर्तनकार शिवलिलाताई पाटील,
महाराष्ट्रातील नावाजलेले बाल किर्तनकार आळंदीचे माउली महाराज जाउरकर तसेच राष्ट्रीय किर्तनकारव ज्यांच्या वाणीने महाराष्ट्राला मुग्ध केले ते डॉ. चारूदत्त आफळे व कुटूंब प्रबोधन या विषयावर प्रबोधन करणारे सुप्रसिध्द वक्ते अमोल पुसदकर इत्यादी भरगच्च कार्यकमाची मेजवाणी आर्वीकरांना प्राप्त होणार आहे. या कार्यक्रमासोबतच दि. २८ डिसेंबरला महाराष्ट्राचे प्रसिध्द संत आचार्य जितेंद्रनाथ महाराज पिठाधीश श्री. देवनाथ पीठ यांचे अध्यक्षतेखाली विदर्भातील नामवंत संताचे संत सम्मेलनही होणार आहे. या सात दिवसीय ज्ञानयज्ञात संतश्रेष्ठ
सचिनदेव महाराज यांचे रोज दुपारी मायबाई महाराज याची संत परंपरा या विषयावर प्रवचन होणार आहे. या भव्य अशा कार्यक्रमाचे प्रायोजक म्हणुन सर्वश्री खासदार अमर काळे, आमदार सुमित वानखेडे, अच्यूत महाराज सत्संग मंडळ मुंबईचे अध्यक्ष सुधीरजी दिवे, माजी आमदार दादारावजी केचे, ह.भ.प. प्रा. डॉ. नारायणरावनिकम, सुनिलजी नाथे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप काळे, विनायकराव देशमुख इत्यादी मान्यवर लाभलले आहेत. या भव्य अशा सात दिवसीय कार्यक्रमाचा लाभ आर्वी व परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन समितीतर्फ करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सांगता दि. २९ डिसेंबरला आयोजकांतर्फ
मान्यवरांचा सत्कार, गोपालकाला व महाप्रसादाने होणार आहे. या पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष सुधीर दिवे, कार्याध्यक्ष डॉ. निकम, सचिव कृष्णा गिरधर, समिती सदस्य अनिल जोशी, विवेक वैद्य, राजाभाउ गिरधर, गौरव इत्यादी उपस्थित होते. जाजु, एकनाथ गिरधर, धनंजय चौबे,, शैलाताई देशपांडे, गौरव जाजू, एकनाथ गिरधर, धनंजय चौबे, शैलाताई देशपांडे, अंगद गिरधर, सरिका लोखंडे व पुष्पाताई सोनटक्के आदी उपस्थित होते.