चांदुर रेल्वे प्रतिनिधी:- प्रकाश रंगारी
चांदुर रेल्वे – परभणी येथे भारतीय संविधानाच्याप्रतीची विटंबना झाली, आणि संपूर्ण आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली. या घटने- मुळे परभणी येथील संपूर्ण आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली. तणाव निर्माण होताच आंबेडकरी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना सुद्धा अटक केली. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतीत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.
त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सविस्तर न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. त्यांच्या मृत्यू मागील सत्य बाहेर यावे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी. आणि संविधान विरोधी कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी. यापुढे संविधानाची विटंब होऊ नये, याची खबरदारी शासनाने घ्यावी. अशा प्रकारचे निवेदन आज दिनांक१७/१२/२०२४ मंगळवार रोजी ३ वाजता उपविभागीय अधिकारी चांदुर रेल्वे यांना देण्यात आले. त्यावेळी चंद्रदीप उर्फ नानासाहेब डोंगरे, प्रकाश रंगारी उमेश गोंडाने, सक्षम वानखडे,भीमचंद दुर्योधन,बबन मोहोड, ऍड.लौकिक डोंगरे, अभय रामटेके, सक्षम वानखडे, पांडुरंग मेश्राम, विशाल सोनवणे,सुनील मेश्राम, सम्यक जंजाळ, दर्शन नन्नवरे, अर्पित मकेश्वर, आयुष डोंगरे,भारत तावडे,दर्शन रामटेके, प्रतीक वावरे, सुमित झिंगरे, रविकांत भोमकाळे, सौरभ गवई, आर्यन दाभाडे, विश्वजीत घोडेस्वार, पांडुरंग हुमणे, रवींद्र सोमकुवर, हरिभाऊ, आदींची उपस्थिती होती.