विद्यापीठ रोडवर दिनांक 16 डिसेंबर पासून भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब खडसे यांचे आमरण उपोषण सुरू. भीम सेनेचे लक्षवेधी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी सुरू.

0
3
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती दी १७ दिसंबर ( प्रतिनिधी) व्यंकैयापुरा ,इंदिरा गांधी नगर ,चिलम छावणी, डेबुजी नगर या झोपड़पट्टी वाशीयांना त्यांच्या घराचे पीआर कार्ड देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी भीम सेनेने विद्यापीठ रोडवरील महाबीज मंडळाच्या कार्यालया पुढे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून या भागातील नागरिक पी आर कार्ड व घरकुल आवास योजने पासून वंचित आहे येथील नागरिकांना त्यांच्या घराचे पीआर कार्ड तातडीने देण्यात यावे व येथील लोकांना घरकुल आवास योजनेचा लाभ देण्यात यावा याकरिता भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दादासाहेब खडसे यांनी आज दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून या ठिकाणी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. दलित पैंथर ,महानायक संघटना, रिपब्लिकन पार्टी ,पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि पत्रकार संघटनेने भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब खडसे यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. आंदोलनात महानायक संघटनेचे प्रमुख माजी नगरसेवक सुरेश मेश्राम दलित पॅंथर चे नेते प्रदीप महाजन पत्रकार दिगंबर भगत शम्मी शहा भीम सेनेचे केंद्रीय सचिव श्री मनोज ढवळे, भाऊरावजी भमकाडे, भीमसेनेचे तिवसा येथील नेते भाऊरावजी गडलिंग, हरिकिशन तायडे पाटील इसराइल शेख बाबू ,बडे भाई मेहमूद शहा, बाळासाहेब वानखडे, देवरावजी मोलके, इत्यादी भीमसैनिक व वंचित नागरिक या आंदोलन सहभागी झाले आहे

veer nayak

Google Ad