आ.प्रतापदादा अडसड मंत्रिपदाचे हक्कदार. कृष्णा बोडने यांचे मुख्यमंत्र्याना निवेदन

0
5
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती :- विधानसभा

2019 निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात भाजपची एकमेव जागा निवडून देणारे आ. प्रतापदादा अडसड यांना मंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष कृष्णा बोडने यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. या संदर्भात नुकतेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यात जनतेने गेली कित्येक वर्ष भारतीय जनता पक्षाला कौल दिला आहे. यामागे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नेतृत्वाचे विशेष योगदान आहे. गेली कित्येक वर्ष भारतीय जनता पक्षाचे अरुणभाऊ अडसड व त्यांचे पुत्र आ. प्रतापदादा अडसड यांनी वेळोवेळी जनतेचे प्रश्न व मागण्या मार्गी लावून त्यांच्या समस्या निकाली काढल्या आहेत. त्याची पोच म्हणून विधानसभा 2019 निवडणुकीत भाजपचे उमेदवार आ. प्रतापदादा अडसड यांना निवडून दिले. तर विधानसभा 2019 निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात शिवसेना-भाजप युतीची एकमेव जागा आ.प्रतापदादा अडसड यांनी निवडून दिली आहे. 

veer nayak

Google Ad