धामणगाव रेल्वे,
देशी गौ माते मध्ये लक्ष्मीचा वास असतो आपल्या पुराणांमध्ये सुद्धा गौ मातेचा उल्लेख आहे त्यामुळे देशी गाईचे संरक्षण,जतन संवर्धन आणि उत्थान करणे आपले व गौरक्षण संस्थानांचे कार्य आहे असे प्रतिपादन माहेश्वरी वरिष्ठ महिला मंडळाच्या प्रमुख शांताबाई मुंदडा यांनी गौरक्षण येथे केले.
त्या वरिष्ठ माहेश्वरी मंडळातर्फे गौरक्षण संस्थेला प्रदान करण्यात आलेल्या गौ माता भेट या कार्यक्रमात बोलत होत्या माहेश्वरी वरिष्ठ महिला मंडळातर्फे येथील गौरक्षण संस्थेला गावरानी देशी गाय भेट देण्यात आल्यात हे येथे उल्लेखनीय.
यावेळी माहेश्वरी वरिष्ठ मंडळाच्या सर्व महिला सुद्धा उपस्थित होत्या त्या म्हणाल्या की सर्वच गौरक्षण संस्थांनी देशी गायीचे संरक्षण करणे गरजेचे आहे कारण देशी गायीचे दूध गोमूत्र प्रकृती करिता उपयोगी आहे भगवान श्रीकृष्णाने आपल्यासोबत देशी गाई आणल्याचे पुराणात आढळते या मंगलमय प्रसंगी पंडित शरद पांडे यांनी पूजा-अर्चना व शांतीपाठ वाचन केले संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार राठी उपाध्यक्ष गिरीश मुंदडा सचिव संजय राठी यांनी वरिष्ठ माहेश्वरी महिला मंडळाचे आभार व्यक्त केले.