पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे अधिकाऱ्याच्या रूपाने दिव्यांगांसाठी देवदत्त

0
8
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिवस हा दिवस दिव्यांग बांधवांसाठी वैभवगाचा सर्वांगण विकासाचा व प्रगतीचा दिवस आहे कारण देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात झाले आहे.

जागतिक दिव्यांग दिवसानिमित्त पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे साहेब यांची भेट घेतली व यांना दिव्यांगदिवसाच्या निमित्त कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले. सरांनी आम्हाला दहा मिनिटे वेळ दिला सर फार बिझी शेड्युल होता . दिव्यांग अधिनियम कायदा 2016,1995 या बाबत माहिती दिली शासकीय व निमशासकीय अधिकारी दिव्यांगा बाबत संवेदनशील असणे आवश्यक आहे. दिव्यांग कायदा अधिनियम (कलम 6) समान संधी व योग्य वागणूक दिली पाहिजे सर्व शासकीय कार्यालयात दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी व विभागीय तक्रार निवारण अ समिती गटित केली पाहिजे दिव्यांग अधिनियम (कलम 23) याबाबत सरांचा फार पॉझिटिव्ह दृष्टिकोन होता त्यांनी तत्काळ सर्व माहिती घेतली व याबाबत सर्व पोलीस स्टेशनला तत्काळ सूचना देण्याचे परिपत्रक सुद्धा काढण्यात निर्देश देण्यात आले सरांचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन दिव्यांग बाबत सौजन्य पाहून व दिव्यांची समस्या नीट समजून ऐकून घेतल्या खरोखरच कौतुक करणे सारखेच आहे.आदरणीय पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे साहेब दिव्यांग बाबत तळमळ त्यांच्या निरागस चेहऱ्यावर दिसत होते. खरोखरच कर्तव्यदक्ष,कर्तव्यनिष्ठ व उत्तम प्रशासकीय अधिकारी आहेत.  

5 डिसेंबर 2024 आदरणीय सरांनी वेळेतून वेळ काढून रक्तदान शिबिर व दिव्यांग कार्यशाळेला भेट दिली. *रक्तदान महादान आहे व सर्वश्रेष्ठ दान आहे रक्ताची सतत कमतरता असते ज्यांना शक्य होईल त्यांनी रक्तदान करावे अतिशय गरजवंत रुग्णांना त्याचा उपयोग होईल. मानवी रक्ताला कोणताही पर्याय नाही रक्तदान हाच एकमेव पर्याय समाजा पुढे आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी रक्तदान करावे रक्तदान हे मानवता कार्य आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे*

“संत तुकोबाराय म्हटले ….

जे का रांजले गांजले म्हणे..

 तो आपुले तोची साधू ओळखावा देव तिथेच जाणवा..”

 खरोखरच आदरणीय पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे साहेब हे दिव्यांगासाठी देवदूत आहे.

विलास शिंदे (मा.आंतरराष्ट्रीय पॅरा खेळाडू) 

अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी (संघटना शासन मान्यता प्राप्त) विद्युत विभाग मुंबई 32.

veer nayak

Google Ad