भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे येतात. समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला.
त्यानंतर 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनुयायी तसेच सर्व समाजातील नागरिक विनम्र अभिवादन करण्याकरिता करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगर परिषद येथे हजारो संख्येने अनुयायी आले होते. अनेक जाती धर्मातील नागरिक व अनुयायी सकाळपासूनच नगरपरिषद प्रांगणात असलेल्या डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून मेणबत्ती लावून त्यांना अभिवादन केले. अनेक ठिकाणी दवाखान्यामध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होत असल्याकारणाने समाजसेवक अनिल वहिले, प्रवीण हेंडवे व प्रशांत मून, मोहोड सर छंदक भाऊ थुल सर , मनोहर सर ,सचिन मून, ज्योती पाटील डॉक्टर पवन झटाले आणि रक्तदान समितीचे सर्व कार्यकर्ते व सहकारी यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये अनेक युवक, पुरुष स्त्रिया यांनी सहभागी होऊन रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी यांनी सुद्धा रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.