डॉ.भीमराव आंबेडकर यांचा स्मृतिदिन ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून आयोजित केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. शांततेच्या मार्गाने घडून आलेले हे जगातील सर्वात मोठे धर्मांतरण होते..
आज दिनांक – 6 डिसेंबर डॉ. भीमराव आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन निमित्य से. फ. ला. हायस्कूल, धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर रंगीत खडूंच्या माध्यमातून व तसेच विशिष्ट रंग माध्यमातून चित्र रेखाटन करून आपल्या कलेद्वारे त्यांना त्रिवार अभिवादन केले..