नगर परिषद शासकीय ईमारत आर्वी येथे नवनिर्वाचित आमदार मा.श्री. सुमित भाऊ वानखेडे यांच्या हस्ते लिफ्टचे उद्घाटन

0
77
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी : आज दिनांक 2/12/2024 रोज सोमवार ला मा.श्री. सुमित भाऊ वानखेडे आमदार यांनी नगर परिषद शासकीय ईमारत आर्वी येथे प्रशासकीय कामाच्या आढावा संदर्भात भेट देऊन संबंधित विषयाचे सद्या स्थितीतील कामकाज चा संपूर्ण आढावा घेतला असून प्रथम भेटी दरम्यान मा. मुख्याधिकारी श्री. किरण सुकलवाड यांच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यांत आले .त्याच प्रमाणे नगर परिषद येथे सर्व कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन स्वीकारल्या नंतर एक आढावा बैठक घेण्यात आली..

 नंतर मा. श्री सुमित भाऊ वानखेडे आमदार, मा. श्री. किरण सुकलवाड मुख्याधिकारी न . प. मा. श्री.संजय भाऊ राऊत माझी बांधकाम सभापती न.प.यांच्या उपस्थितीत नगर परिषद प्रशासकीय ईमारत येथील नवीन लिफ्ट चे लोकार्पण करण्यांत आले.

सदरच्या कार्यक्रमात श्री संजय अभोरे जिल्हाध्यक्ष कर्मचारी संघटना वर्धा जिल्हा, श्री साकेत राऊत कनिष्ठ अभियंता, श्री अक्षय राऊत अभियंता, श्री सुनील आरिकर, आरोग्य निरीक्षक, श्री. सुरेंद्र चोचमकर स्वच्छता अभियंता, श्री गणेश खडके कर अधीक्षक,तसेच सर्व कर्मचारी वृंद नगर परिषद व शहरातील गणमान्य नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

veer nayak

Google Ad