आर्वी : स्थानिक शिवाजी चौकातील गुंड प्रवृत्तीचे खेतेश्वर स्वीट मार्टचे पाच व्यवसायिकांनी सामूहिकरित्या केलेल्या हल्ल्यात तीन युवक गंभीर जखमी पोलिसांच्या मदतीने तिघांनाही सुरूवातीला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले तसेच प्रायमरी उपचार करून प्रकृती गंभीर असल्यामुळे अमरावती येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. असल्याची माहिती पोलिसांनी दिली. २८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून
जखमी पैकी अनिकेत मारोतराव कुबेटकर, ओम मुकुंदा गोठाणे, जयेश अरुण डहाके सर्व राहणार आर्वी असे गंभीर जखमी झालेल्यांचे नावे आहे. ते २८ नोव्हेंबर रोजी स्थानिक शिवाजी चौक येथील खेतेश्वर राजस्थान स्वीट्स या व्यवसायिकांच्या दुकानात चिप्सचे पॅकेट घेण्यासाठी गेले असता महेंद्रसिंग राजगुरू यांनी अरेरावी करून उद्धटपणाची वागणूक देऊन त्याला परत जाण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा शाब्दिक वाद विकोपास जावून हाणामारीत पर्यावसान झाले. दरम्यान, महेंद्रसिंग गुलाब सिंग राजपुरोहित याने विनोद सिंग गुलाबसिंग राजपुरोहित, पुरुषोत्तम प्रेमलाल यादव, सत्येंद्र सोमनाथ यादव आणि आणखी दोन जणांना बोलाविले. सहा जण येताच त्यांनी तिघांना बेदम मारहाण केली. त्यामुळे तिघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव झाला हाेता तसेच आर्वीकरांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्नही केला परंतु खेतेश्वर स्वीट मार्ट व्यावसायिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने शिवाजी चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हि माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली.
तसेच २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास खेतेश्वर स्वीट मार्टच्या दुकानाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात
संतप्त आर्वीकर नागरिकांनी आर्वी पोलिस स्टेशनला अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अटक करून गुन्हा दाखल करा अशी मागणी केली तसेच महेंद्रसिंग राजपुरोहित, विनोद सिंग राजपुरोहित पुरुषोत्तम यादव, सत्येंद्र यादव या चौघांना अटक केली व तेथून दोघे फरार झाल्याचे व घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तीन निष्पाप युवकांना बेदम मारहाण तीनही युवक गंभीर जखमी संतप्त आर्वीकरांनी गुंड प्रवृत्तीच्या हॉटेल व्यवसायिकावर कडक कार्यवाही करण्याची पोलीस उपविभागीय खंडेराव यांना निवेदनातून केली मागणी विनोदसिंग राजपुरोहित व त्याचे पाच सहकार्यांनी आर्वी शहरातील आपल्या तीन निष्पाप युवकांनवर प्रणघातक हल्ला केल्याने दि. ३० नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी चौक येथे सम्सत आर्वीकर व सर्व संघटनेचे पदाधीकारी एकत्र येऊन गुंड प्रवृत्तीच्या खेतेश्वर राजस्थानी स्वीट मार्ट हॉटेल वर जाऊन निषेधार्थ बॅनर लावुन निषेध केला व तसेच आर्वी पोलीस स्टेशन येथे कडक कार्यवाहीचे निवेदन देण्याकरिता सर्व समस्त आर्वीकरांच्या व सर्व संघटनेच्या उपस्थितीत पोलीस उपविभागीय अधिकारी खंडेराव यांना निवेदन देण्यात आले.
तसेच यावेळी प्रांतीक तैलीक महासभा संघटना, भारतीय जनता पार्टी, युवा काँग्रेस कमेटी MIM, टिपू सुलतान ग्रुप, विश्वहिंदू परिषद, बजरंग दल, बहुजन आघाडी, भीम सेना सर्व संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने आर्वीकर नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.