क्रीडा क्षेत्राला प्रशासनाची सर्वतोपरी मदत – जिल्हाधिकारी सौरभ कटियार

0
24
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 29 : जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीचा विकास होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात जिल्हा प्रशासनातर्फे नेमबाजीचे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांतराव चेंडके, सचिव माधुरी चेंडके, शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेचे संचालक सतिश माळोदे, डॉ. एस. एस. कुमार, डॉ. एस. सी. देशपांडे, प्राचार्य श्रीनिवास देशपांडे आदी उपस्थित होते.

श्री. कटियार यांनी, देशामध्ये आज क्रिडा क्षेत्रात मोजक्या चांगल्या संस्था कार्यरत आहे. यात एचव्हीपीएमचे नाव आहे. संस्थेचा जुना इतिहास आहे. संस्थेने परंपरा आणि आदर्श कायम ठेवली आहे. संस्थेने नेमबाजीसाठी सुविधा निर्माण करून दिली आहे. त्यामुळे प्राविण्यप्राप्त खेळाडू तयार होऊन पदके प्राप्त करीत आहे. प्रशासन खेळाडूंना चांगल्या सुविधा प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट प्रदर्शन करून पदके प्राप्त करून संस्थेला गौरव प्राप्त करून द्यावा, असे आवाहन केले.

श्री. माळोदे यांनी संस्थेने नेमबाजीसाठी कमी वेळेत कायापालट करून खेळाडूंसाठी सुविधा निर्माण केली आहे. संस्थेने मिशन ऑलिंपिकचे उद्दिष्ट ठेवले आहे, यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.

श्रीमती चेंडके यांनी प्रास्ताविकातून सर्वांच्या मदतीने नेमबाजीची सुविधा निर्माण झाली आहे. या खेळासाठी उपलब्ध असलेल्या सुविधेतून खेळाडूंनी नेत्रदिपक यश मिळविले आहे. यानंतरही संस्थेतर्फे खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच अत्याधुनिक साहित्य देण्यात आल्याबद्दल आभार मानले.

यावेळी जान्हवी मानतकर यांच्यासह विविध स्पर्धांमध्ये पदकप्राप्त खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. आनंद महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

veer nayak

Google Ad