श्री गुरुदेव प्रचारक दिन महोत्सव अर्थात प्रचारकांचे महासंमेलनाचे आयोजन

0
24
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

श्री संत लहानुजी महाराज संस्था श्री क्षेत्र टाकरखेड तालुका आर्वी जिल्हा वर्धा येथे श्री गुरुदेव प्रचारक दिन महोत्सव अर्थात प्रचारकांचे महासंमेलनाचे आयोजन दिनांक 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 पर्यंत करण्यात आले आहे. देशातील गावेच नव्हे तर संपूर्ण भारत देश आदर्शवान होऊन या भूतलावर वैकुंठीचा प्रेमानंद व सतयुगीचा समतावाद निर्माण व्हावा म्हणून मानवतेचे महान पुजारी वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या साहित्यातून विचारांची प्रेरणा केली. त्यांचे विचार विश्वाला गवसणी घालणारे असून त्यांच्या स्वप्नातील ग्रामराज्य निर्माण करण्याकरिता अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्त्व प्रणालीनुसार वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जन्मस्थान स्मृती समिती श्री क्षेत्र यावली शहीद अंतर्गत त्रीदिवशीय श्री गुरुदेव प्रचारक दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रचाराकांचे हे तिसरे महासंमेलन यावर्षी दिनांक 29, 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2024 पर्यंत श्री संत लहानुजी महाराज संस्थान श्री क्षेत्र टाकळखेड येथे संपन्न होत असून प्रस्तुत कार्यक्रमास प्रचारक तसेच गुरुदेव भक्तांनी येण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सामुदायिक ध्यान प्रार्थना व चिंतन, भजनानंद व प्रबोधन सत्र ,प्रचाराकांचे मनोगत कीर्तन अनुभवाचे बोल व भव्य सत्कार समारंभ असा या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.

veer nayak

Google Ad