अमरावती, दि. 26 : संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज सकाळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी महसूल विजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले. या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय संविधान व त्यातील मूल्य, हक्क-अधिकार व कलम यासंबंधी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी उपस्थितांना माहिती दिली.