आज राजस्थान चे महामहिम राज्यपाल श्री. हरिभाऊ बागडे यांनी आदरणीय अरूणभाऊ अडसड यांचे अरूणोदय निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी त्यांचे औक्षण करत पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अरुणभाऊ अडसड भेट घेत तब्येतीची विचारपूस केली आणि सोबतच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.