अमरावती, दि. 12 : नेहरु युवा केंद्रातर्फे धामणगांव रेल्वे येथील आदर्श महाविद्यालयात नशामुक्त तरुणाई, जागरूकता आणि शिक्षण कार्यक्रम पार पडला.
प्राचार्य डॉ. सुधीर बायस्कर अध्यक्षस्थानी होते. डॉ. मुकुंदराव पवार स्कूलच्या वसतिगृहाचे अधीक्षक ग्रामगिताचार्य हनुमंतदादा ठाकरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. दिपक शृंगारे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाला डॉ. संजय पाटील, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण केचे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. पूनम गहूकर, प्रा. विलास नागोसे, प्रा. विशाल मोकाशे, प्रा. समीक्षा वानखडे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी वैष्णवी राठोड, सुवर्णा वंजारी, मैथिली वैद्य, स्नेहल पतालिया, विद्या बोबडे, महेंद्र काळे, भूमेश्वरी ठोंबरे यांनी पुढाकार घेतला. तानिया टेकाम हिने सूत्रसंचालन केले. प्रा. विशाल मोकाशे यांनी आभार मानले.