धामणगाव रेल्वे:
धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित आदर्श विज्ञान जे.बी. कला व बिर्ला वाणिज्य महाविद्यालय धामणगाव रेल्वे येथे दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 ला भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 94 व्या वर्धापन दिनानिमित्त ” वाचन प्रेरणा दिन” ग्रंथालय व भाषाभ्यास मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा प्रस्तुत आविष्कार 2024 यामध्ये विद्यार्थ्यांना संशोधन व वैज्ञानिक दृष्टि मिळण्यासाठी विविध शाखेंच्या विद्यार्थ्यांसाठी ARC ( Adarsha Research Convention) महाविद्यालयीन स्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली.कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. बायस्कार अध्यक्ष म्हणून लाभले, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य डॉ. वाय. बी. गांडोळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. शिल्पा विधळे यांनी केले. व्यासपीठावर ग्रंथालय प्रमुख डॉ.आर. आर. कुरळकर, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय पाटील, प्रा.डॉ एस.एस. शर्मा, प्रा.डॉ. पूनम गहुकर, प्रा. भारती लोखंडे या प्रामुख्याने उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी वाचन सप्ताह निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ज्यात चारोळी लेखन संकलन स्पर्धा, म्हणी संकलन, वाचन स्पर्धा, काव्यवाचन, महाराष्ट्रीयन लोकगीत स्पर्धा, निबंध स्पर्धा माझा आवडता लेखक व लेख लिखाण स्पर्धा मोबाईल आणि आजचा बदलता तरुण व वाचन संस्कृतीचा ऱ्हास: कारणे, मीमांसा आणि उपाय अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. चित्रलेखा कोल्हे यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा. डॉ. पठाण यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. संजय पाटील, प्रा.भारती लोखंडे, प्रा.प्रिया रूपवणे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा.जितेंद्र बारुळकर, प्रा. एस. शेळके, प्रा. डॉ. घोगरे, प्रा. डॉ. केचे, प्रा. डॉ.. मुंगसे, प्रा. मेंढे, प्रा. विशाल मोकाशे, प्रा. राऊत, प्रा.घोपे तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.