श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित एस.ओ. एस. कब्स. येथे दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दसरा हिंदू धर्मा चा एक महत्त्वपूर्ण सण आहे जो असत्या वर सत्याचा विजय मिळवण्याचे प्रतीक आहे.या दिवशी भगवान राम ने रावणा वर विजय मिळवला होता म्हणून या दिवसाला विजयादशमी सुध्दा म्हणतात.
केजी १ चे विद्यार्थि सार्थक मुंदडा भगवान राम च्या ,हित पगारिया लक्ष्मण, रुही चव्हाण सिता तर सोमेश राठी रावणा च्या वेशभूषेत आले होते. दसरा सणा चे महत्व व आपण दसरा सण का साजरा करतो या विषयी माहिती शिक्षीका राणी रावेकर यांनी दिली तसेच नर्सरी ते केजी २ च्या विद्यार्थ्यांचा धनुष्य बाणाने तीर मारण्याचा उपक्रम राबविण्यात आला होती.या उपक्रमा मध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.विद्यार्थ्यांमधील समन्वय आणि एकाग्रता वाढवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका मा. प्रचिती धर्माधिकारी व प्री प्रायमरी हेड मा. शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रणिता जोशी, रेणुका सबाने, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, राणी रावेकर, प्राजक्ता दारूंडे, श्रद्धा रॉय, अश्विनी नांदने यांनी सहकार्य केले.