धामणगाव रेल्वे,
शैलाताईंनी याप्रसंगी वंदे मातरम् या विषयावर उत्कृष्ट आणि सविस्तर असे मार्गदर्शन केले त्या म्हणाला की, राष्ट्र सेवका समिती संपूर्णपणे राष्ट्राला समर्पित आहे आपल्या मुलींना राष्ट्रसेविका समितीमध्ये जोडून मुलींचे स्वतःचे आणि राष्ट्राचे सर्वांगीण विकास करण्याची संधी आणि वेळ आलेली आहे त्यामुळे संस्कार, संस्कृति, आचार, विचार,एकता या आधारावर प्रगति पथावर असलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या कार्याला समर्थन करून राष्ट्राचे परम वैभवाचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता योगदान करावे असे आवाहन ही शैलाताईंनी यावेळी केले याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉक्टर स्वाती बनसोडे यांनी राष्ट्रसेविका समितीच्या कार्याचा गौरव करून राष्ट्रसेविका समिती एक संस्कारपूर्ण आणि मुलींना घडविण्याचे व स्वयंस्फूर्त करणारी एक राष्ट्रभक्त संघटना असल्याचे सांगितले
समितीच्या धामणगाव नगराच्या विजयादशमी उत्सवापूर्वी दुपारी गणवेशधारी सेविकांचे पथसंचलन परसोडी रोड वरील पसारी दाल मिल येथून प्रारंभ होऊन इंदाणी बिछायत केंद्र पासून मुख्य बाजार रोड, सिनेमा चौक, शनी महाराज मंदिर चौक, टिळक चौक,शास्त्री चौक ते शिवाजी संघस्थान पर्यंत निघाले पथसंचलनाचे ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले उत्सव स्थळी समितीच्या सेविकांनी प्रात्यक्षिक सादर केले तद्नंतर लगेच प्रगट उत्सव संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय सौ. रत्नाताई पोळ संचालन आणि आभार नगर कार्यवाहीका सौ.वैष्णवी देशपांडे यांनी व्यक्त केले