पुलगाव
आर.के.ज्ञान मंदिरम इंग्लिश मीडियम स्कूल नाचणगाव, पुलगाव येथे ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य श्री नितीन श्रीवास, पर्यवेक्षिका प्रीती बिडकर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी विशेष परिपाठाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे प्राचार्य नितिन श्रीवास, पर्यवेक्षिका प्रिती बीडकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित सर्वांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सर्व विद्यार्थ्यांना संबोधित करतांना शाळेचे प्राचार्य नितीन श्रीवास यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व आपल्या ओजस्वी वाणीतून व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नितीन श्रीवास यांच्या सुरेख मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग,आयोजन समिती, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.