अमरावती जिल्ह्यात चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक १२/१०/२०२४ शनिवारला संस्थानचे वतीने आयोजित “दसरा यात्रा महोत्सव” निमित्त सकाळी ११.०० वाजता “चंदन उटी व रमणा” आणि दुपारी ४.०० वाजता महाराजांचे “झेंडे चढविण्याचा भव्य दिव्य नेत्रदीप सोहळा” संस्थानचे विश्वस्त चरणदास कांडलकर,सावंगा (विठोबा) यांचे शुभ हस्ते आणि विश्वस्त मंडळाचे उपस्थित संपन्न होत आहे.
या महोत्सवात बाहेर गावावरून येणाऱ्या भाविक भक्तांकरिता संस्थानचे अन्नदान समितीच्या नियंत्रणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे दि.१७/१०/२०२४ ते दि.१५/११/२०२४ पर्यंत संस्थानमध्ये दैनंदिन सकाळी ५.०० ते ७.०० या कालावधीत “काकडा कार्यक्रम” सुरू होत आहे,तरी या कार्यक्रमात समस्त गावकरी मंडळी आणि भाविक भक्तांनी सहभागी व्हावे,असे आवाहन संस्थानचे वतीने करण्यात येत आहे.
तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, सर्व विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, दिगांबर राठोड, अनिल बेलसरे, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.