चांदुर रेल्वे / मागील 28 वर्षापासून शहरातील नगर नवदुर्गा मंडळाच्या वतीने शहरातील सिनेमा चौक येथे घटस्थापना करून दुर्गा देवीची मूर्ती बसवण्यात येत असून विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे,यावर्षी सुद्धा मंडळाच्या वतीने 4 ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता शहरातील सिनेमा चौक येथील रामदेव बाबा मंदिर येथे संत अच्युत महाराज दवाखान्यातील हृदय रोग तज्ञ डॉ, अनुप डोंगरे डॉ, श्रीराम राठी, यांच्या मार्गदर्शनात मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या शिबिरामध्ये 92 रुग्णांनी हृदयरोग, बीपी शुगर इसीजी की निशुल्क तपासणी करण्यात आली,
मागील 28 वर्षापासून मंडळाच्या वतीने शहरात दुर्गा देवी ची मूर्ती स्थापनेचे आयोजना सोबतच विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात येत आहे, काही वर्षा अगोदर मंडळाच्या वतीने शहरातील सिनेमा चौक येथे उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांची ताण भागवण्यासाठी थंड पाण्याची मशीन बसवण्यात आली होती, यावर्षी सुद्धा तालुक्यातील व शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत मंडळाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी सोबतच बीपी शुगर च्या तपासण्या सुद्धा करण्यात आले, हे शिबिर अमरावती येथील श्री संत अच्युत महाराज दवाखान्यातील हृदयरोग तज्ञ डॉ अनुप डोंगरे, डॉ श्रीराम राठी, यांच्या मार्गदर्शनात सविता सायनारे, प्रज्ञा देवळे, मीनाक्षी चौबे,सीमा दुर्वे, निर्मला उईके, शैलेश बोरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तर शिबिरा करिता मंडळाचे अध्यक्ष मनीष मुंदडा,संजय उज्जैनकर सतीश जयस्वाल प्रशांत माकोडे सुनील राऊत,बंडू आठवले, सचिन चंदाराणा,गुड्डू शर्मा अभिजीत तिवारी दिनेश मारोटे गोलू जालन वैभव पांडे तसेच मंडळातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले,