धामणगाव रेल्वे- तालुका प्रतिनिधी
धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक चंद्रभान आनंदराव मडावी यांचा नियत वयोमानाप्रमाणे सेवापूर्ती सोहळा नुकताच पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे तसेच कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती ज्येष्ठ शिक्षक चंद्रभान मडावी तसेच प्रमुख अतिथी विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.प्रदीप मानकर, प्रमुख उपस्थिती विद्यालयाचे पर्यवेक्षक अनिल लाहोटी हे व्यासपीठावर उपस्थित होते..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रदीप मानकर यांनी केले.. विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक चंद्रभान मडावी यांची 38 वर्ष सेवा झाली.. विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रदीप मानकर यांनी चंद्रभान मडावी यांच्या सेवा कारकर्दीबद्दल त्यांनी विद्यालयासाठी दिलेल्या योगदान बद्दल कित्येक उदाहरणे देऊन त्यांचा गौरव केला.. या कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे यांचे प्रा.प्रदीप मानकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.. प्रमुख अतिथी प्रदीप मानकर यांचे अनिल लाहोटी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रमुख उपस्थिती अनिल लाहोटी यांचे विद्यालयाचे शिक्षक रवींद्र जिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या कार्यक्रमाच्या वेळी शिक्षक वक्ते अनिलजी लाहोटी व कैलाश चौधर यांनी या सत्कारमूर्ती बद्दल विद्यालयात सोबत घालवलेल्या कार्यकाळाबद्दल, त्यांच्या कौटुंबिक संबंध बद्दल माहिती दिली व पुढील उत्तम आरोग्य व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयातून सेवानिवृत्त होत असलेले विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक चंद्रभान मडावी यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे,उपप्राचार्य प्रा.प्रदीप मानकर व पर्यवेक्षक अनिलजी लाहोटी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व भेटवस्तू व तसेच सन्मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.. सत्कारमूर्ती चंद्रभान मडावी यांना विद्यालयातर्फे दिलेल्या सन्मानपत्राचे वाचन विद्यालयाच्या शिक्षिका दीक्षा तिवारी यांनी केले..
सत्कारमूर्ती चंद्रभान मडावी यांनी आपल्या मनोगतात धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या नेहमी ऋणात राहू.. तसेच विद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. धा.ए.सो. च्या सर्व पदाधिकारी व से. फ. ला. विदयालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत शेंडे यांनी आपल्या मनोगतात सत्कारमूर्तींना निरामय आरोग्य व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक पवन लांबाडे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..