अमरावती जिल्ह्यातील तहसील नांदगाव खंडेश्वर अंतर्गत येनस येथील रहिवासी अशोक बारसे हे दिव्यांग असून त्यांचा उदरनिर्वाह मासिक पेन्शन पंधराशे रुपये व स्वस्त धान्य दुकानात मिळणारे हक्काचे धान्य यावर अवलंबून आहे. असे असताना राशन दुकानदार गुणवंत बाबाराव कणसे यांना कट्ट्यातील धान्य मागितले असता, खाली पडलेले झाडझुड केलेले धान्य देऊन जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचे तहसील कार्यालय मध्ये दिलेल्या तक्रारी म्हटले आहे. तसेच अशोक बारसे यांना नेहमीच दर महिन्याला मिळणारे धान्य आणण्यासाठी गेले असता, मशीन बंद आहे, सर्वर डाऊन आहे, उद्या येशील असा त्रास दिल्या जात आहे. तक्रार करते अशोक बारशे यांनी पाटील साहेब असे का करता आमच्यासोबत? असे विचारता मी करीन, माझ्याजवळ आमदार आहे खासदार आहे. माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही. अशा भाषेत बोलत असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
यापूर्वी दोन वेळा सदर धान्य दुकानदार गुणवंत बाबाराव कणसे यांचे स्वस्त धान्य परवाना रद्द करण्यात आला होता. एकाच कुटुंबातील व्यक्तींना विभक्त दाखवून त्यांच्या नावे वेगवेगळ्या धान्यांची परस्पर अफरातफर करून सदर दुकानदार कळ्या बाजारात त्या धान्याची विक्री करत असल्याचे सिद्ध झाल्याने त्या दुकानदाराचे निलंबन करण्यात आले होते. नंतर पुन्हा एकदा हात काळे करून त्याला परवाना देण्यात आला. भ्रष्टाचाराची चटक लागलेला हा स्वस्त धान्य परवानाधारक दुकानदार तेवढ्यावर मानला नाही. पुन्हा त्याने आपल्या भ्रष्टाचाराची शृंखला कायम ठेवली. आणि गावातील मयत असलेल्या व्यक्तींचे रेशन कार्ड चालू ठेवून, त्यांच्या नावे परस्पर धान्य उचलून विक्रमी भ्रष्टाचार या महाशयाने केला. गावकऱ्यांनी त्रस्त होऊन याची तक्रार तहसील कार्यालयात केल्यानंतर. त्यांचे सदर दुकानदारास पाठबळ असल्याचे लक्षात आले. परंतु गावकरी ठाम राहिल्याने आणि प्रचंड संघर्ष केल्यानंतर गुणवंत बाबाराव कणसे यांचा परवाना रद्द केला.
परंतु या भ्रष्टाचारात खूप मोठी साखळी असल्याने वरिष्ठांचा वरदहस्त या परवानाधारकाच्या डोक्यावर असल्याचे स्पष्ट होते. म्हणून पुन्हा एकदा त्यालाच परवाना देण्यात आला. अशा या भ्रष्टाचारी रेशन धान्य दुकानदाराला इतका अभय कसा दिला जातो? याचा शोध व्हायला हवा असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणात अनेक मोठे मासे गळाला लागतील हे मात्र खरे. तूर्तास तक्रारदार अशोक सूर्यभान बारसे हे दिव्यांग असल्याने त्यांना व्यवस्थित राशन देऊ घरापर्यंत सुखरूप पोहोचण्याची जबाबदारी ही राशन दुकानदाराची होती. परंतु त्यांना एक दोन तास उभे ठेवून त्रास देत आहे. तेव्हा त्यांनी राशन दुकानदाराचा परवाना रद्द होण्याची मागणी केली असून, मला न्याय देण्यात यावा ही मागणी तहसीलदाराकडे आपल्या तक्रारीत केलेली आहे. मागणी मान्य न झाल्यास ते स्वतः आमरण उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही. अशे मत त्यांनी व्यक्त केले