राज्य शासनाने गौ मातेला ” राज्य माता ‘ घोषित केल्याचा आंनदोत्सव उत्साहात साजरा…पोलीस प्रशासनाने केले सहकार्य 

0
5
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे :- 

महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतेच आपल्या भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून पूज्यनीय मानल्या जाणाऱ्या गौ मातेला राज्य माता दर्जा दिला ह्या ऎतिहासिक निर्णया निमित्य जल्लोष करण्यासाठी बलासाहेब ठाकरे चौकात सायंकाळी ६:०० वाजता गौ सांसद सेवा समिती द्वारा जल्लोष करण्यासाठी तसेच राज्य सरकार चे आभार मानण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये समस्त गौ.भक्तासाठी मसाला भात व कढी, जलेबी चे वाटप करून हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी सर्वप्रथम राज्य शासनाचे आभार मानून गोमातेचे फोटोचे पूजा अर्चना करण्यात आली, तर तर सदस्यांच्या वतीने मसाला भात वाटप झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे चौकातील साफसफाई सुद्धा करण्यात आली,ह्या कार्यक्रमाचे आयोजन पंडित विनोद तिवारी,पंडित देवराज तिवारी ,पंडित अभिजित तिवारी , समाजिक कार्यकर्ता नंदा वाधवानी ,माजी नगरसेविका स्वाती मेटे , समाजिक कार्यकर्ता पप्पू उर्फ निलेश भालेराव ,अमित तळोकर ,गोलु यादव, गजानन ठाकरे ,मंगेश तसरे व पत्रकार राजेश सराफी, बच्चू वानरे, हरिदास जी चुकेकर, बंटी गोखले, प्रप्रुल कोकाटे,विनय कडु ,समीर जानवानी, सुजल कोल्हापुरे,पप्पी पटले, पवन अहिर,यांनी आयोजन करून हा कार्यक्रम यशस्वी

करण्यासाठी परिश्रम घेतले त्याच बरोबर पोलीस प्रशासनाने चौकावर बंदोबस्त लावून कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.

 

veer nayak

Google Ad