धामणगाव रेल्वे मधील विद्यार्थिनींनी क्रीडा संकुल अमरावती येथे झालेल्या जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेत अंडर-14 मध्ये विजेतेपद पटकावले.

0
36
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स मधील विद्यार्थिनींनी क्रीडा संकुल 27/09/24 अमरावती येथे झालेल्या जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींनी विजेतेपद पटकावले आणि विभागीय स्तरावर या विद्यार्थिनींची निवड झाली. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी वर्ग सहावी ते सातवीचे चैतन्या डहाके , हर्षिता ठाकूर , मधुरा राऊत , गितिका तिवारी , भूमी बामनोटे , कनक पालीवाल, आरिया ठाकूर , द्यानवी नायकवाड, आराध्या अग्रवाल , क्षिताजा इंगोले ,मधुरा वानखेडे , आणि ग्रीष्मा गावंडे यांनी या स्पर्धेत यश संपादन करून शाळेचे नावलौकिक केले. रग्बी विजयी संघाला शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले . क्रीडा शिक्षक मुस्कान कांबळे, नितीन जाधव यांचे विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेतील सर्व विजयी विद्यार्थिनींना विभागीय स्तरावर खेळण्याकरिता प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी आणि सर्व शिक्षकवृंदांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या

veer nayak

Google Ad