राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त स्वच्छता अभियान

0
30
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

ना.खडेश्वर प्रतिनिधी प्रदीप रघुते
विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अलका भिसे आणि IQAC समन्वयक डॉ सुचिता खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय ते नांदगाव बस स्टॉप येते स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालया आजूबाजूची स्वच्छता, YES जुनिअर कॉलेज या ठिकाणचे स्वच्छता करण्यात आली त्यानंतर नांदगाव बस स्टॅन्ड येते स्वच्छता अभियान राबवण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी प्लास्टिक कचरा तसेच प्लास्टिक बॉटल्स इत्यादी कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट करण्यात आली. रा से यो कार्यक्रम अधिकारी डॉ दशरथ काळे महिला कार्यक्रम अधिकारी डॉ प्रतिभा महल्ले यांनी या अभियानाचे आयोजन केले.

veer nayak

Google Ad