पुलगाव
आर. के. ज्ञान मंदिरम इंग्लिश मिडीयम स्कुल नाचणंगाव येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून आर .के. माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री लाल बहादूर यादव सर हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख अतिथी श्री लाल बहादूर यादव सर, शाळेचे प्राचार्य नितिन श्रीवास, पर्यवेक्षिका प्रीती बिडकर, हिंदी शिक्षिका अर्चना वर्मा व योगिता तिवरे यांच्या हस्ते विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती, राष्ट्रभाषा हिंदी चे जनक भारतेंदू हरीशचन्द्र यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख अतिथी श्री लाल बहादूर यादव सर, हिंदी शिक्षिका अर्चना वर्मा व योगिता तिवरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चमूने समाजशास्त्र शिक्षिका अमृता माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा स्तवन सादर केले. काही विद्यार्थ्यांच्या चमूने हिंदी शिक्षिका अर्चना वर्मा यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली ‘हिंदी बिमार है” ये हिंदी भाषेचे महत्त्व सांगणारे सुंदर नाटक सादर केले जे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. विद्यार्थ्यांनी हिंदी कविता, हास्य कविता , हिंदी गीत अतिशय समर्पकपणे सादर केले. प्रमुख अतिथी श्री लालबहादूर यादव सर व शाळेचे प्राचार्य नितीन श्रीवास सर यांनी हिंदी दिवसाचे महत्त्व आपल्या ओजस्वी वाणीतून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी समृद्धी वैद्य व आस्था खडसे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रेया दुबे हिने केले.
शाळेचे प्राचार्य नितिन श्रीवास , पर्यवेक्षिका प्रीती बिडकर, पर्यवेक्षिका प्रणिता कोंबे यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती, सांस्कृतिक विभाग, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.