श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये ” शिक्षक दिन “मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले. शिक्षक दिन हा भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून साजरा करण्यात येतो. शिक्षक दिनाच्या निमिताने, रेड हाऊसच्या वतीने विशेष परिपाठाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भाषणातून शिक्षकाचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगितले आणि शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला. शाळेच्या प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी यांनी शिक्षण आणि शिस्त या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी परिषद सदस्य यांनी शिक्षकांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले. शाळेच्या प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी यांच्या हस्ते शिक्षकांचे ग्रीटिंग कार्डस आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी, व्यवस्थापन समिती आणि रुबी हाऊस सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग दहावि ची विद्यार्थिनी शर्वरी तायडे आणि राजवीर शीरभाते यांनी केले तर आभार प्रदर्शन अन्वयी बिरे हिने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले आणि हा कार्यक्रम यशस्वी केला.
Home आपला विदर्भ अमरावती धामणगाव रेल्वेः- स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये “शिक्षक दिन” मोठ्या उत्साहात साजरा.