धामणगाव रेल्वे,ता.५:- महाराष्ट्र सरकारच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गुरुवारला (ता.५) मुख्याध्यापक श्रीकृष्ण चव्हाण यांना मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
धामणगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा कासारखेडा येथील श्रीकृष्ण चव्हाण यांना यावर्षी जिल्हा तथा राज्याचा आदर्श असा दुहेरी सन्मान मिळाला आहे.याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, शिक्षण आयुक्त सुरज मांडरे, प्रधान सचिव आय ए कुंदन, राज्य प्रकल्प संचालक आर. विमला आदि मान्यवरांच्या उपस्थितीत चव्हाण यांना सन्मानचिन्ह,मानपत्र, एक लाख दहा हजार रूपयांचा धनादेश देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले
धामणगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा कासारखेडा येथील श्रीकृष्ण चव्हाण यांना यावर्षी जिल्हा तथा राज्याचा आदर्श असा दुहेरी सन्मान मिळाला आहे.त्यांनी यावर्षी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन राज्यस्तरीय प्रशिक्षणात तज्ज्ञ म्हणून कार्य केले.शिवाय तालुक्यात एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. एक दिलखुलास, हसतमुख असलेले हे विद्यार्थी हित जोपासून विद्यार्जनाचे कार्य करतात. विद्यार्थ्यांसाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम त्या राबवित असतात.आपल्या शाळेत सुजान व संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याबरोबरच शाळा विकासासाठी अनेक विविध उपक्रम राबवले आहेत. समाज व शाळेच्या भौतिक विकासातही त्यांचे मोठे योगदान आहे.साहित्य,नाट्य व कला क्षेत्राची विशेष आवड आहे.शिक्षक दिनाच्या औचीत्यावर मुंबई येथे मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचेकडून पुरस्कार स्वीकारतांना