बोधिसत्व ते सम्यक सबूद्ध नव समाजाला प्रेरणादायी ठरणारा ग्रंथ आचार्य बी.सी. वानखडे

0
23
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

बोधिसत्व ते सम्यक संबुद्ध हा ग्रंथ समाजाला व नव तरुणांना प्रेरणादायी ठरणारा असल्याचे मत आचार्य बी.सी. वानखडे यांनी ग्रंथ प्रकाशन वेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलत असताना मत मांडले.
या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष पूज्य भंतेरत्न रत्नबोधी महास्थवीर होते तर प्रमुख अतिथी म्हणून आचार्य बीसी वानखडे प्रमोद हातेकर विजय लोखंडे डोंगरे साहेब पंकज मेंढे आधी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
बोधिसत्व ते सम्यक संबुद्ध हा ग्रंथ पंकज मेंढे यांनी आपल्या अथक प्रयत्नांमधून लिहिला या ग्रंथाचे प्रकाशन जीवक बुद्ध विहार येथे करण्यात आला.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिपिटकांमधून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची निर्मिती केली असली काही भाग घेऊन या ग्रंथाची मांडणी केली व प्रकाशन करण्यात आले असे मत पंकज मेंढे यांनी ग्रंथाविषयी बोलताना केले.
आ आदर्श समाजाची निर्मिती ही धार्मिक बनून करता येते असे वानखडे साहेब यांनी बोलताना केले त्यानंतर पूज्य भंते रत्नबोधी यांनी यावेळी उपस्थित त्यांना धम्मदेशना दिली. व आपले अध्यक्ष भाषण करत असताना या ग्रंथामधून नावीन्यपूर्ण समाजाला दिशा देणारे ग्रंथ असल्याची त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर नगराळे यांनी केले.
सूत्रसंचालन ईश्वरदास बागडे तर आभार प्रदर्शन गौतम शेंडे यांनी केले.
या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला संपूर्ण तालुक्यातील नागरिक महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा प्रकाशन सोडायचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्वश्री जीवन बुद्ध विहाराच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad