उपेक्षित असलेल्या भोई समाजाच्या मागण्यांकरिता ५सप्टेंबर ला चांदूर रेल्वे येथे धडक मोर्चा

0
20
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

-अठरा अलुतेदारांपैकी एक,प्राचीन इतिहास लाभलेला,मासेमारी हा मुख्य व्यवसाय असणा-या *’भोई’* या भटक्या समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे.भोई समाजातील लोकांची अवस्था दयनीय असून हा समाज शिक्षण,रोजगार व आर्थिकदृष्ट्या फार कमकुवत झाला आहे.यासाठीचं समाजातील युवा नेतृत्व सुरज मेश्राम यांच्या नेतृत्वात ५ सप्टेंबर २०२४ रोजी उपविभागीय कार्यालय येथे समाज मोठ्या संख्येत हजर राहून आरक्षण व मागण्यांबाबत निवेदन सादर करणार आहेत.ईतर राज्यात भोई समाज हा अनुसूचित जात किंवा अनुसूचित जमातीत मोडण्यात येतो,फक्त महाराष्ट्रात भटक्या जमाती ‘ब’ मध्ये येत असून‌ यांत एकुण ३७ जाती समाविष्ट आहेत व आरक्षण फक्त २.५ टक्के आहे जे असुन नसल्याप्रमाणे आहे. आर्थिक,शैक्षणिक बाबतीत भोई समाजाला डावलले गेले असून घरकुल व शासनाच्या इतर योजना,सुविधा मिळत नाही.भोई समाजाच्या प्रगतीसाठी आपल्याला एकत्र येऊन आपली व्यथा शासनापुढे मांडायची आहे,आमचा भोई समाज हा झोपलेला नाही,आमच्या समाजाच्या मागण्यांची शासनाने दखल घ्यावी यासाठी सर्व भोई समाजातील युवक युवती,पुरूष,वृद्ध,विद्यार्थी आणि खास करुन महिला वर्ग यांनी दिनांक ५ सप्टेंबर २०२४ गुरुवार रोजी पोलिस स्टेशन समोरील रामनगर ग्राउंड येथे ठिक सकाळी १० वाजता घराघरांतून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समाजाचे युवा नेतृत्व‌ सुरज मेश्राम यांनी केले आहे.

veer nayak

Google Ad