पीएमश्री शिवाजी प्राथमिक शाळा नगरपरिषद आर्वी येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आज दिनांक 31 ऑगस्ट 2024 ला घेण्यात आली. कार्यशाळेचे आयोजन मा. मुख्याध्यापिका कुमारी पदमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले .कार्य शाळेला मूर्तिकार श्री अजय कळने व योगेश खंडारे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कशी तयार करायची याचे प्रात्यक्षिक देऊन माहिती दिली. प्रत्यक्ष मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक करून याकरिता त्यांनी फक्त शाडू मातीचा वापर केला. शाडू मातीच्या मूर्तीच वापरण्याचे त्यांनी आवाहन केले पीओपी पेक्षा शाडूच्या मातीची मूर्ती ही पर्यावरण पूरक असून मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात विरघळून जाते. तसेच पाणीही दूषित होत नाही व जीवजंतूलाही धोका निर्माण होत नाही . भारतासह देश विदेशात पोहोचलेला गणेश गणेश उत्सव काळानुरूप बदलत आहे मात्र आज साजरे होणारे गणेश उत्सव हे पर्यावरणाला हानिकारक ठरत आहे याकरिता पर्यावरण पूरक मूर्ती वापरण्याचे आवाहन केले . कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही तसेच गणेश उत्सवातील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरण स्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल .पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ही आपली जबाबदारी व काळाची गरज आहे तरच पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल. यासाठी आजच्या या कार्यशाळेतून पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन कसे करावे नैसर्गिक, साधन संपत्तीचे जतन कसे करावे, वातावरणातील समतोल कसा राखला जाईल अशा अनेक बाबींची माहिती देण्यात आली.
कार्यशाळेत सर्व विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये उत्साहाने सहभाग घेतला आज विद्यार्थी खूप आनंदीत होते आजची कार्यशाळा अतिशय यशस्वी ठरली. कार्यशाळेचे संचालक श्री महेश मते सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री विवेक कामडी सर यांनी केले