मा. श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित एस ओ एस कब्स येथे राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी २९ऑगस्ट या दिवशी भारतीय हॉकी दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या जयतीनिमित्त राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा करण्यात येतो. प्री प्रायमरी हेड आदरणीय शबाना खान मॅडम आणि सहायक शिक्षिका अश्विनी नांदणे मॅडम यांनी राष्ट्रीय क्रिडा दिनाविषयी माहिती दिली.क्रिडा नायकांच्या योगदानाचा सन्मान करून खेळ आणि शारिरीक तंदुरूस्तीला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा उद्देश आहे.या क्रिडा दिना निमित्त शाळेत विविध प्रकारचे इनढोर आणि आऊटडोर खेळांचा उपक्रम आयोजित करण्यात आला जसे हर्डल रेस, लूपी खेळ, ऑबस्टॅकल रेस, स्टीकिंग बॉल रेस या सारखे खेळ खेळण्यात आले .शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय प्रचिती धर्माधिकारी मॅडम आणि प्री प्रायमरी हेड मा. शबाना खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमच्या यशस्वीतेकरिता प्रणिता जोशी, रेणुका सबाने, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, राणी रावेकर, प्राजक्ता दारूंडे श्रध्दा राॅय, आश्विनी नांदणे यांचे सहकार्य लाभले.