सावंगा विठोबा नगरीत “अमावस्या ” निमित्त “चंदन उटी” आणि “श्रावण मास मांड वाढवा”

0
35
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती जिल्हात चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक ३/८/२०२४ मंगळवारला दुपारी ४.०० वाजता संस्थानच्या वतीने “अमावस्या ” निमित्त “चंदन – ऊटीचा कार्यक्रम” संस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे.

चंदनउटी नंतर बाहेर गावावरून येणारे भाविकांकरिता “महाप्रसाद कार्यक्रम” संस्थानचे अन्नदान समितीच्या नियोजनात आयोजन करण्यात आले आहे.

संस्थानमध्ये दि.५/८/२०२४ ते दि.८/९/२०२४ पर्यंत संस्थान तर्फे “श्रावण मास” निमित्त “अखंड जागृती भजन” मांडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अखंड मांडीचा वाढवा दि. ८/९/२०२४ रविवार रोजी सकाळी ९.०० वाजता अरज आणि आरतीने विश्वस्त मंडळ आणि भाविक भक्तांचे उपस्थित संपन्न होत आहे आणि दुपारी १२.०० वाजता सर्व गावकरी आणि भाविक भक्तांसाठी “भव्य महाप्रसादाचे” आयोजन करण्यात आले आहे. ज्या भाविक भक्तांनी या मांडीमध्ये “सेवाधारी” म्हणून महाराजांच्या चरणी सेवा समर्पित केली आहे, अशा भाविकांचा संस्थानचे वतीने “सत्कार” करण्यात येत आहे.

तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील,वामण रामटेके,गोविंद राठोड,दिगांबर राठोड,अनिल बेलसरे,फुलसिंग राठोड,चरणदास कांडलकर,वैभव मानकर, स्वप्निल चौधरी विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

veer nayak

Google Ad