“सुमितदादा आम्हा युवक युवतींचे प्रेरणास्थान” – लाडक्या बहिणींनी दिली शब्दांना वाट “‘आपले सरकार’ सत्तेवर आहे, तो पर्यंत योजना अविरतपणे सुरू “-सुमित वानखेडे * *सुमित वानखेडेंचा ‘लाडक्या बहिणींशी’ मुक्त संवाद * *लाडक्या बहिणींनी उपस्थितां समोर निर्भयपणे मांडले विचार *

0
96
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

कारंजा (घा)
लाडक्या बहिणींचा देवाभाऊ जो पर्यंत मंत्रालयात आहे, तो पर्यंत ‘लाडकी बहीण योजना’ अविरत सुरू राहणार आहे असे प्रतिपादन कारंजा येथे आयोजित ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ कार्यक्रमा दरम्यान वर्धा लोकसभा निवडणूक प्रमुख व युवा नेते सुमित वानखेडे यांनी करत महिलेंना योजनेबाबत आश्वस्त केले. खोटे बोलून या योजनेचा अपप्रचार करणाऱ्यां पासून सावध राहण्याचे आवाहन करत गावोगावी जाऊन महीलांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे हा मुख्य उद्देश या कार्यक्रमांचा असल्याचे त्यांनी सांगितले.

कारंजा नगरीचे आराध्य दैवत श्री. संत लटारे महाराजांच्या मंदिरामध्ये पूजन करून आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक सुमित वानखेडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव सरिता गाखरे,कारंजा तालुका प्रभारी मुकुंदराव बारंगे,बाबूजी लढ्ढा, चक्रधर डोंगरे, कारंजा नगरपंचायत चे सभापती राहुल झोरे,नगरसेवक हेमराज भांगे, नगरसेविका तथा माजी सभापती योगिता कदम, उषा चव्हाण, रमा दुर्गे,वैशाली सरोदे, सुवर्णा कावडकर, शिरीष भांगे, शेख निसार,निता गजाम, रेवता धोटे, प्रमोद चौहाण, संजय कदम, सुधाकर दुर्गे, गजानन सरोदे, अजय कावडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुण्यांचे आगमन होण्यापूर्वी नागपूर येथून आलेल्या पल्लवी पुरोहित यांनी महिलांचे अनेक वेगवेगळे खेळ घेवून महिलांचे मनोरंजन केले. व पाहुण्यांचे हस्ते विजयी महिलांना बक्षीस देण्यात आले.

परमेष्टी अनुसया माता भजन मंडळातील महिलांनी लाडकी बहीण योजना मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुंदर गीत सादर केले व गीतातून आभार मानले.

सुमित वानखेडे यांनी नारीशक्ती च्या सन्मानार्थ उपस्थित महिलांना स्वतः माईक हातात घेऊन योजने संदर्भात महीलांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी खेळीमेळीचे वातावरण निर्माण करत महिलांना बोलके केले. महिला देखील सुमित वानखेडे यांच्या विनंतीला मान देत निर्भयपणे व्यक्त झाल्या. काही महिलांनी मनोगत मांडताना सुमित वानखेडे यांनी कारंजा शहरा करीता ३४ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून श्री संत लटारे महाराजांच्या पालखीच्या दिवशी महाराजांच्या चरणी योजना मान्यतेसाठी चा शासन निर्णय अर्पण केल्याने मंदिर कमेटीने त्यांचा सत्कार केला होता असे सांगत पाणी पुरवठा योजनेसाठी सुमित वानखेडे यांनी दिलेला शब्द पाळला होता या घटनेला लाडक्या बहीणींनी उजाळा देत कारंजा ची पाणी समस्या निकाली लागली असल्याने सुमित वानखेडे यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे प्रमोद चव्हाण, संजय कदम, अजय कावडकर यांनी गधेमार नाल्याच्या सौंदर्यकरणाकरिता दिलेल्या निवेदनावर सुमित वानखेडे यांनी 7 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल सर्व महिलांनी सुमितदादांचें आभार मानले.
सुमित वानखडे यांच्या प्रयत्नाने कारंजा येथे 500 एकर एमआयडीसी मंजूर झालेली आहे, पुढील काळात तेथे अनेक मोठे उद्योग येवून बेरोजगारांचा प्रश्न मार्गी लागेल असे प्रतिपादन उपस्थित महिलांनी केले व सुमित वानखडे यांचे आभार मानले.

कारंजा येथे झालेल्या कार्यक्रमात ‘लाडक्या बहिणींचा ‘ खेळीमेळीच्या प्रफुल्लित वातावरणात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान महीलांनी त्याच्यासाठी ‘महायुती सरकारने’ नाविन्यपूर्ण योजना राबविल्या बद्दल आभार व्यक्त करत ‘देवाभाऊंच्या’ पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. एका बाजूला युवतीने मुलींना डिग्री पर्यंतचे शिक्षण मोफत केल्याने देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले. तसेच सुमितदादा युवक युवतींचे रोल मॉडेल असुन आमचे प्रेरणा स्थान असल्याचे कॉलेज विद्यार्थिनीनी सांगीतले.आधीच्या सरकारने शिक्षणाचा बाजार केल्याने महाविकास आघाडीवर उपस्थीत महिलांनी रोश व्यक्त केला.

कारंजा शहराकरिता मंजूर पाणीपुरवठा योजना, नालासौंदरीकरण व नव्याने मंजूर केलेली 500 एकर एमआयडीसी, ही सर्व महत्वाची कामे सुमित वानखडे यांच्या माध्यमातून मार्गी लागल्याने उपस्थित सर्व महिलांनी सुमित वानखडे यांचे आभार मानले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
सुमित दादा वानखेडे हे आपले पाठीराखा भाऊ असंल्याचे प्रतिपादन सरीता गाखरे यांनी केलें. महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत सुमित वानखडे यांनी कशाप्रकारे कामाला सुरुवात केली असल्याचे योगिता कदम संबोधित करत असताना सांगितले.,शिरीष भांगे यांनी सुमित वानखेडे हे “बोले तैसा चाले” या मनी प्रमाणे काम करणारे व्यक्ती असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन कारंजा महिला आघाडी शहर अध्यक्षा ज्योती यावले, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रेमसिंग महिले यांनी करत सुमित वानखेडे यांच्या अरबी विधानसभेतील विकास कामांवर प्रकाश टाकला.

उपस्थित महिलांनी सुमित वानखेडे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले व सेल्फी चां आनंद घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता कारंजा शहर अध्यक्ष दिलीप जसुतकर, संजय कदम, प्रमोद चौहाण, सुधाकर दुर्गे, गजानन सरोदे,अजय कावडकर, राहुल झोरे, हेमराज भांगे, रमा दुर्गे, वैशाली सरोदे, उषा चौहाण, योगिता कदम, सुवर्णा कावडकर, प्राची काळपांडे, दिव्यांनी सरोदे,शैलेश घिमे, सुदिप भांगे, राजू काळपांडे, किशोर भांगे ,निलेश मस्की, सुमित बारई, सुमित चाफले, नितीन बनकर, सचिन राऊत, सुदर्शन चरपे, बूथ प्रमुख शक्तीकेंद्रप्रमुख, वॉरियर्स, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.

veer nayak

Google Ad