अमरावती, दि. 24 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज अमरावती येथील बेलोरा विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री महोदयांचे स्वागत केले.
आमदार रवी राणा, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा , पोलीस अधीक्षक (ग्रामीण)विशाल आनंद, महापालिका आयुक्त सचिन कलंत्री यावेळ उपस्थित होते.
यवतमाळ येथील महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रमासाठी मंत्री महोदय नुकतेच यवतमाळ येथे पोहचले आहेत.