चांदुर रेल्वे/ स्वतःच्या घरासमोर सुरू असलेले चिकन मटन विक्रीचे दुकान हटविण्यासाठी प्रणय साहेबराव चौवरे नामक एका 24 वर्षीय सुशिक्षित इंजिनीयर असलेल्या युवकाने सुरू केलेले आमरण उपोषण अखेर चौथ्या दिवशी मुख्याधिकारी यांच्या हस्ते सोडवण्यात आले आपल्या न्यायिक मागणी करिता एका सुशिक्षित युवकाले चार दिवस उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला, प्रशासनाच्या हेखींखोरी धोरणामुळे झालेल्या शैक्षणिक नुकसाना चे अखेर जबाबदार कोण? आपल्या न्यायिक मागण्याकरिता प्रशासना ने कोणतीही ठोस भूमिका घेऊन न शकल्यामुळे उपोषणकर्त्याच्या बहिणीने उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी स्थानीय न प मुख्य अधिकाऱ्यासमोर अश्रूचा बांध फुटला,
साहेब आम्ही दोघेही माझा भाऊ व मी पोस्ट ग्रॅज्युएट सिव्हिल इंजिनियरचा अभ्यासक्रमाला शिकत आहे. आम्ही याबाबत अनेकदा निवेदन दिले आपण चार महिन्यापासून या बाबी वर कुठल्याही प्रकारचा तोडगा काढला नाही. सदर चिकन मटन विक्रीचे दुकाने आमच्या घरासमोर असल्यामुळे आम्हाला त्याचा किती त्रास होतो, किती दुर्गंधी येते, हे साहेब आम्हालाच माहीत आहे, त्यामुळे आता तरी या बाबीवर तोडगा काढून काहीतरी कारवाई करावी अशी विनंती उपोषणकर्त्याच्या बहिणीने केली
19 ऑगस्ट पासून प्रणय साहेबराव चवरे नामक सुशिक्षित इंजिनीयर युवकाचे घरासमोर बिना परवानगीने उघड्यावर चिकन मटन विक्रीचे दुकाने चालू आहे, त्यामुळे आम्हाला व परिसरातील लोकांना दुर्गंधीच सामना करावा लागत आहे, या संदर्भात आम्ही व परिसरातील लोकांनी अनेक वेळा
स्थानीय नगर पालिका प्रशासनाला निवेदने देत आहोत, सरते शेवटी याकरिता एका सुशिक्षित युवकाला 19 ऑगस्ट पासून उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला,उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी न प मुख्याधिकारी उपोषणकर्त्याला भेट देण्यासाठी आले असता अवघ्या चार मिनिटातच त्यांनी उपोषणकर्त्यासोबत थातूरमातूर चर्चा करून निघून गेले, एका वरिष्ठ व जबाबदार अधिकाऱ्याची अशा प्रकारची वागणूकिने उपोषण मंडपात हजर असलेले उपोषणकर्त्याचे कुटुंब, गावातील काही सुशिक्षित नागरिक,समाजसेवक आश्चर्यचकित झाले होते, अखेर उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडवण्यात आले, यावेळी मुख्याधिकारी डॉ विकास खंडारे,जितू कर्से,आशिष खुरटकर,पल्लवी जाभोळकार,राजेश शिर्के, समाजसेवक हर्षल वाघ,हरीभाऊ गवई,सुमेद सरदार,प्रकाश चवरे,राष्ट्रपाल मेश्राम,चंदू ऊके,रूटचंद्र चवरे,पत्रकार अभिजित तिवारी,प्रकाश रंगारी व शहरातील इतर नागरी उपस्थित होते.