अमरावती जिल्ह्यात चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगा (विठोबा) येथे स्वातंत्र्य दिन निमित्त इयत्ता १ ते १२वी मधिल सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींना रोख रक्कम बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे (अध्यक्ष श्री विठोबा संस्थान) प्रमुख अतिथी बंडूभाऊ भोजने (सरपंच) प्रमुख उपस्थिती काशिनाथ मेश्राम (उपसरपंच) यांचे प्रमुख उपस्थितीत जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला.प्रथम मान्यवरांच्या शुभ हस्ते महात्मा गांधीं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. ही बक्षीस रक्कम बक्षीस दाते पुंजाराम नेमाडे यांनी रोख स्वरूपात दिली असून मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मन लावून अभ्यास करणे नितांत गरजेचे आहे. आपणामध्ये जिद्द,चिकाटी आणि मेहनत असेल तरच यश संपादन करू शकतो.सर्व विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा देवून अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात ग्रा.पं.सदस्य संजय मेंढे,से.स.सो.अध्यक्ष विशाल होले,तं.मु.अध्यक्ष सुभाष कडू, प्रतिष्ठित नागरीक रमेश मंगळे,शा.व्य.स.अध्यक्ष विष्णू राठोड तथा सर्व सदस्य, पालक ,पालिका आणि सर्व शिक्षक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन मुख्याध्यापक बनसोड सर आभार प्रदर्शन अध्यापक भोंगाडे सर यांनी केले.