पुलगाव
स्थानिक आर के ज्ञान मंदिरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी एका विशेष परिपाठाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात आर के हायस्कूल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्री रंगलालजी केजडीवाल, विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती व आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, धार्मिक नेते आणि लोकनायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
यावेळी शाळेचे प्राचार्य नितीन श्रीवास, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नितीन श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समिती, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.