मातंग समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उबाठा गटाच्या मा.युवा सेना विधानसभा संघटक उमेश भुजाडणे यांचा भाजपमध्ये प्रवेश.

0
19
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

भारतीय जनता पक्षाचे नेते अरूणभाऊ अडसड यांच्या उपस्थितीत व धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वात झाला पक्षप्रवेश

धामणगाव रेल्वे:-धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लहुजी शक्ती सेना मातंग समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच शिवसेना (उबाठा) चे मातोश्री फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश भुजाडणे, संतोषराव वानखडे अक्षय भाऊ तिरले, कृष्णा भाऊ सरकटे यांनी मातंग समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे.

धामणगाव रेल्वे तालुक्यात मातोश्री फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने राबवणे, विधवा निराधार महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करणे, गोरगरीब रुग्णांची नेत्र तपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून आणणे, बेवा रस मृतदेहाचे अंत्यसंस्कार, अपंगांना कृत्रिम पार्ट वाटप करणे , महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी व्यवसाय प्रशिक्षण देणे,असे अनेक समाज उपयोगी कार्य त्यांनी मातोश्री फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केले आहेत.

आमदार प्रतापदादा अडसड यांच्या सर्व समावेशक विकास धोरणावर विश्वास ठेवून त्यांनी भाजप या पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी उपस्थितविदर्भ अध्यक्ष लहुजी शक्ती सेना डॉक्टर रुपेशभाऊ खडसे, पंकजभाऊ जाधव जिल्हाप्रमुख लहुजी शक्ती सेना, गौरवभाऊ गवळी महानगर प्रमुख लहुजी शक्ती सेना, झोंबाडे साहेब विदर्भ सल्लागार लहुजी शक्ती सेना, विनोदभाऊ तिरले तालुका अध्यक्ष लहुजी शक्ती सेना, अशोकरावभाऊ वानखडे अंजनसिंगी, श्रीकृष्णजी पडघान, विकीभाऊ बावणे, गजाननभाऊ डोंगरे, संतोष राव वानखडे, विठ्ठलरावजी राळेकर अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना, मनोज भाऊ डहाके अध्यक्ष भाजपा धामणगाव रेल्वे तालुका, मोहन भाऊ गावंडे अध्यक्ष धामणगाव रेल्वे शहर, संजयभाऊ मेने, कृष्णा भाऊ मारोटकर, डॉ राजेंद्रभाऊ पोपळघाटे ,मंगेश भाऊ मारोडकर, महेंद्र भाऊ इंगळे, गजू इंगळे, गजुभाऊ राऊत, विजयभाऊ बनसोड, पवन भाऊ पडोळे, अरूणभाऊ मडावी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

veer nayak

Google Ad