तक्षशिला वाचनालयामध्ये अभिवादन सोहळा संपन्न

0
11
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

स्थानिक तक्षशिला सार्वजनिक वाचनालय अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
या अभिवादन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मणराव मानकर तर प्रमुख अतिथी म्हणून संदीप इंगळे, राजूभाऊ जांभळे, भीमराव डगारे , देविदास टाले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमुख अतिथी म्हणाली की अण्णाभाऊ साठे केवळ दीड दिवस शाळेमध्ये गेले आणि एक नवी साहित्यामध्ये क्रांती निर्माण केली. अशा महामानवाची या ठिकाणी जयंती साजरी होत आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू ठाकरे तर आभार प्रदर्शन नितीन टाले यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्व शी या ग्रंथालयाचे कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले . यावेळी गावातील गणमान्य मंडळी उपस्थित होते.

veer nayak

Google Ad