मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जास्तीत जास्त पात्र उमेदवारांना सहभागी करुन घ्यावे. आ.प्रताप अडसड यांचे शासकीय,निमशासकीय  खाजगी आस्थापनांना आवाहन  

0
30
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

राज्यातील उद्योगांचा विस्तार आणि युवकांना रोजगार संधी उपलब्ध करुन देणे हे विषय राज्य शासनाच्या प्रथम प्राधान्याचे विषय आहेत. राज्यातील युवकांना त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांवर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता  वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना  राबवण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने ५५०० कोटी रुपये इतकी भरीव तरतूद केली असून दरवर्षी साधारणतः १० लाख उमेदवारांना कार्यप्रशिक्षणाची संधी या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रताप अडसड यांनी दिली आहे

या योजनेबाबत सविस्तर माहिती देतांना अडसड म्हणाले की, योजनेच्या तरतुदींमधून शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ५० हजार योजनादूत नियुक्त केले जातील.  शासकीय / निमशासकीय आस्थापनांना त्यांच्या मजूर पदांच्या ५ टक्के तसेच खाजगी उद्योग, सेवा क्षेत्रातील आस्थापनांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या अनुक्रमे १० आणि २० टक्के उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी घेता येतील. योजनेचा कालावधी ६ महिन्यांचा आहे. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले १८ ते ३५ वयोगटातील विहित शैक्षणिक पात्रता धारण करणारे युवक युवती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. 

 बारावी पास – रु ६००० प्रतिमहिना, पदवीका, आय टी आय – रु ८००० प्रतिमहिना, पदवीधर, पदव्युत्तर  उमेदवार रु १०००० प्रतिमहिना इतके मानधन सहा महिने कालावधीसाठी मानधन मिळवण्यास प्राप्त ठरतील. योजेच्या विस्तृत माहितीसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण – २०२४ /प्र. क्र. ९०/व्यशि -३ दिनांक ०९ जुलै २०२४ चे अवलोकन करावे. 

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून शासकीय / निमशासकीय / खाजगी आस्थापना  तसेच इच्छूक उमेदवारांना उपयोगाची असल्याने जास्तीत जास्त आस्थापना आणि उमेदवार यांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या  www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपली नोंदणी करावी असे आवाहन आ. प्रताप अडसड यांनी केले आहे.

veer nayak

Google Ad