धामणगाव रेल्वे:
मा. श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित एस ओ एस कब्स येथे वर्ल्ड यु. एफ.ओ. डे चे आयोजन करण्यात आले होते. यू. एफ.ओ.डे च्या निमित्ताने शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले त्यामध्ये पालकांसाठी एलियन मास्क बनविने आणि स्पेसशिप बनविने या अँक्टिव्हिटी घेण्यात आल्या. यासाठी पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. अँक्टिव्हिटीच्या माध्यमातुन पालकांना UFO डे चे महत्व समजविण्यात आले. प्री प्रायमरी हेड मा. शबाना खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमच्या यशस्वीतेकरिता प्रणिता जोशी, रेणुका सबाने, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, राणी रावेकर, प्राजक्ता दारूंडे श्रध्दा राॅय, आश्विनी नांदणे यांनी सहकार्य केले