आ.प्रताप अडसड यांच्या पाठपुराव्याने ११ तीर्थक्षेत्रांना ब दर्जा जाहीर अवधूत महाराज , संत योगी भिकाराम महाराज, संत सुरेश महाराज संस्थांनाचा समावेश

0
26
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे

धामणगाव विधानसभा मतदारसंघाचा विकासाच्या माध्यमातून चेहरा- मोहरा बदलवीणाऱ्या आमदार प्रताप अडसड यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मतदारसंघातील तब्बल अकरा तीर्थक्षेत्रांना शुक्रवारी ब दर्जा जाहीर झाला आहे यापूर्वी त्यांच्या प्रयत्नाने तिन महिन्यापूर्वी मांजरखेड कसबा येथील संस्थानाला ब दर्जा प्राप्त झाला आहे

भाजपा महा युतीच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात तिन्ही तालुक्यात आ प्रताप अडसड यांनी विविध योजनेतून कोट्यावधीचा निधी आणून पादन रस्त्यासह चौफेर विकास केला. मागील अनेक वर्षापासून मतदार संघातील तीर्थक्षेत्र ब दर्जा पासून वंचित होते आ अडसड यांनी या दोन वर्षात सातत्याने पाठपुरावा करीत पहिल्या टप्प्यात मांजरखेड कसबा तीर्थक्षेत्रांना ब दर्जा मिळवून दिला तर स्वतः संस्थानकडून कागदपत्राचा पाठपुरावा करीत पुन्हा ११ तीर्थक्षेत्राला ब दर्जा मिळवून दिला

अकरा तीर्थक्षेत्रांना ब दर्जा

क्षेत्र नागमंदिर संस्थान, (गव्हाळा) चांदूर वाडी,अवद्युत महाराज संस्थान, कारला,संत योगी भिकाजी महाराज संस्थान आष्टा,रामनाथ स्वामी संस्थान, वाढोणा रामनाथ,

संत खप्ती महाराज संस्थान बागापूर,संत एकनाथ महाराज संस्थान द्वस्ट आमला विश्वेश्वर,ऋषी महाराज संस्थांन त्रिवेणी संगम,नागोबा देवस्थान, भिलटेक,क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान शेलूगुंड,सुरेश बाबा संस्थान फुबगाव,संत बुदगिर महाराज व श्री. संत अमृत महाराज देवस्थान सार्सी (कोठोरा) या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे

यापूर्वी या तीर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जा देण्यात आला होता. शासनाने याबाबत पाहणी करून त्यात सुधारणा करत ब वर्ग दर्जा देण्यात आला. यामुळे राज्य शासन भक्त निवास, भोजनालय, गावातील अंतर्गत रस्ते आदी विकास कामासाठी भरीव निधी देणार आहे. त्यामुळे देवस्थानाच्या विकास कामाला मोठी चालना मिळणार आहे. आ प्रताप अडसड यांच्या सतत पाठपुराव्यामुळे ब दर्जा मिळाल्याने संस्थांनचे पदाधिकारी व भाविकांनी आ.अडसड यांचे आभार व्यक्त केले आहे

veer nayak

Google Ad