राज्यातील मुख्य शेतकरी नेत्यांची आज पुण्यात संयुक्त बैठक झाली. सदर बैठकीसाठी मा.श्री वामनराव चटप , मा. श्री राजू शेट्टी , मा श्री शंकर अण्णा घोंगडे , मा. श्री अनिल घनवट, मा श्री ललित बहळ हे शेतकरी नेते उपस्थित होते. राज्यातील सर्व शेतकरी संघटनांची / चळवळीशी निगडित पक्षांची एकत्र मिळून “परीवर्तन आघाडी” नावाने संयुक्त आघाडी निर्माण करण्याचे आज ठरले.
राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्या या आलटून पालटून सत्तेत येऊन देखील शेतकऱ्यांच्या हितार्थ कोणतेही निर्णय घेऊ शकले नाहीत. राज्यात आजही दररोज सरासरी १३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात हे मोठे दुर्दैव…. शहरात सामान्य माणूस महागाई , भ्रष्टाचार , बेरोजगारी मुळे पार मेटाकुटीला आलेला आहे.
राज्यातील आगामी विधान सभेच्या निवडणुकीत स्वच्छ चेहऱ्याचे उमेदवार राज्यातील सर्व मतदार संघात उभे करण्यात येतील. पुढील बैठक येत्या ३० जुलै रोजी औरंगाबाद येथे घेण्याचे आज ठरले.